HW News Marathi
राजकारण

‘या’ महिनाअखेरीस मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई | राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या महिनाअखेरीस म्हणजेच २७ फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या अधिवेशनाचा कालावधी २५ फेब्रुवारी ते २ मार्च असा असणार आहे. आज (५ फेब्रुवारी) विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एका दिवसाने वाढविण्याची मागणी केली होती. विखे-पाटील यांच्या मागणीनुसार अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला आहे. दरम्यान, राज्याच्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांसाठी खुशखबर, आता राज्याबाहेर करू शकणार भ्रमंती

News Desk

“…सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील”, सामनातून बंड पुकारलेल्या आमदारांना इशारा

Aprna

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, शहाणपणा शिकवण्याची गरज नाही !

News Desk