HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हा परिषदे आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई | राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१२ एप्रिल) संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार अभिजीत वंजारी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रूटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणातील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईला महाराष्ट्रापासून कोणत्याही परिस्थिती तोडू शकत नाही

News Desk

बलात्काराचे सर्व आरोप खोटे पण माझा आणि करूणा शर्मांचा संबंध होता,धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा!

News Desk

महाराष्ट्रात प्रत्येक कारवाई ‘ही’ कायद्याने होणार!, राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडीनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna