HW News Marathi
मनोरंजन

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली | पाकिस्तानी सुप्रिद्ध सुफियाना गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने नोटीस बजावली आहे. राहत यांनी फेमा (FEMA) या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. राहत फतेह अली यांनी अवैधरित्या परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने या तस्करी संदर्भात त्यांना उत्तर मागितले आहे.

राहत फतेह अली यांनी अवैधरीत्या ३,४०,००० यूएस डॉलर कमावले असून त्यापैकी २,२५,००० डॉलरची तस्करी करण्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या चौकशी दरम्यान समाधान कारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना दंड देखील भरावा लागेल. जर राहत फतेह अली यांनी दंड भरला नाही तर त्यांना लूक आऊट नोटीसही पाठवली जाणार आहे.

या आधी २०११ मध्ये देखील राहत फतेह अली यांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वालाख डॉलरसह पकडण्यात आले होते. त्यावेळी राहत फतेह अली यांच्याजवळ रकमेशी संबंधित कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राहत फतेह अली यांच्यासह त्यांच्या मॅनेजरलाही पोलिसांनी अटक केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाहीर गफूरभाई पुणेकर पंचतत्वात विलीन

News Desk

मलिष्काला स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा

News Desk

कलावंत हीच माझी जात | नाना पाटेकर

News Desk