अहमदाबाद | गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाघेला भाजपचे नेते अशी त्यांची ओळख आहे. याआधी वाघेला यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. परंतु त्यांनी २०१७मध्ये काँग्रेसमधून भाजपत गेले होते.
आता राजकारणात पुन्हा नव्या इनिंगसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वाघेला यांनी राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वाघेला हे गुजरात राज्यातील राजकारणातील अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी वाघेला यांनी स्वत:चा एक नवीन पक्ष स्थापन केला होता. परंतु, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे स्वत:चे आणि मुलाचे राजकीय करिअर वाचविण्यासाठी ते घड्याळाचे टायमिंग साधणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा किती फायदा होणार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पाहता येईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.