HW News Marathi
राजकारण

अरे लाज विकून खाल्ली आहे या सरकारने !

मुंबई | “भाजप सेनेला लाज वाटायला हवी. या राज्यात राज्य करताना १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले. अरे लाज विकून खाल्ली आहे या सरकारने”, अशी बोचरी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चाळीसगावच्या जाहीर सभेत सरकारवर केली आहे.

२०१४ मध्ये आजची तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत होती. आज तीच तरुणाई ‘गली गली में शोर है चौकीदार चोर है’ असे म्हणत आहे. देश बदलत आहे की नाही माहित नाही. परंतु, आता हा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

आता पुन्हा वेगवेगळी आश्वासने, स्वप्न दाखवतील परंतु मालिकेच्या अगोदर किंवा सिनेमाच्या अगोदर ही कथा काल्पनिक आहे अशी सूचना येते त्याचप्रमाणे त्यांची भाषणे देखील काल्पनिक असतील हे लक्षात ठेवा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

शिवस्मारक बांधण्याआधी खर्च वसुलीचे सरकारला कोडे

News Desk

…तोपर्यंत ही सगळी निवडणुकीची जुमलेबाजी सुरूच राहील !

News Desk