श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील राजबागजवळील झिरो पुलावर गुरुवारी (१७ जानेवारी) दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुलावर वाहतूक पोलीस सेवा देत असतानाही ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
#JammuAndKashmir: 3 persons injured after terrorists hurled grenade on security forces at Zero Bridge in Srinagar today. Injured have been admitted to a hospital and are currently stable. More details awaited. pic.twitter.com/GdcxFYcSSb
— ANI (@ANI) January 17, 2019
या हल्ल्यानंतर सुरक्षा जवानांनी येथील संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. ही घटना नॅशनल कॉन्फरन्सच्या मुख्यालयापासून १०० मीटर अंतरावर घडली आहे. घटनास्थळापासून येथून जवळच आकाशवाणीचे स्थानिक कार्यालय आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.