HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख आज (९ जानेवारी) जाहीर करण्यात आली आहे. हे अधिवेशन मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असून या अधिवेशनाची सुरुवात २१ जानेवारीपासून सुरू होणार असून १३ फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला देशाचा बेजट सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकाच्या आधारावर अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार असल्याचे म्हटले जाते

कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीच्या बैठकीत (CCPA) अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरविण्यात आली आहे. लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. कारण एप्रिल किंवा मे महिन्यात आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

मोदी सरकारसाठी हा अंतरिम अर्थसंकल्पात महत्वाचा असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार आपला अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करणार असून या अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी मोठी घोषणा करून त्यांना खुश करण्या त्यांचा प्रयत्न असणार आहे. तसेच नोकरदारांच्या कर बचत मर्यादेत वाढ आणि आयकराची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहकर्जावरही सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशनात कांदा, कापूसाची माळा घालून NCP च्या आमदारांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna

बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट! –  नाना पटोले

Aprna

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk