HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) कडून दिला आहेत. बेस्टकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरम्यांना ऑफिला जाण्यासाठी चांगली तारेवरची कसरत करावी लागली. शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला पाठिंबा काढून घेतला असला तरी आजही (९ जानेवारी) पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीत. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगळवारी ( ८ जानेवारी) संपाचे हत्या उपसले होते. यानंतर बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना हाल सहन करावे लागले. सेनेच्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईकरांना होणारे त्रास लक्ष्यात घेता संपातून माघात घेतली. तसेच अधिकृतरित्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी जाहीर केले. एवढेच नाही तर बुधवारी (९ जानेवारी) किमान पाचशे बस रस्त्यावर येतील असा दावा देखील करण्यात आला होता. परंतु चालक आणि वाहकांनी शिवसेनेचे आदेश झिडकारले. त्यामुळे सकाळी अवघ्या तीन बस आगाराबाहेर आल्या. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांना रिक्षा व टॅक्सीला दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागला. काहींनी आपल्या खाजगी गाड्या तर काहींनी पायीच रेल्वे स्टेशन गाठले.

जादा लोकल ट्रेनेन चालवणार

बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर जास्त लोकल चालवण्यात येणार आहे. संपामुळे प्रवाशांनी लोकल ट्रेनने प्रवास करत पसंत केले. यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.

मेट्रोचा दिलासा

मुंबई मेट्रो वन कंपनीकडून मेट्रोच्या १२ अतिरिक्त जादा फेऱ्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. अंधेरी व घाटकोपर स्थानकावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायाला मिळत आहे.

मुंबई सेंट्रल डेपो

संपाच्या दुस-या दिवशीही पहिल्या पाळीतील कर्मचारी कामावर आले नाहीत. सकाळी ६ वाजेपर्यंत केवळ पाच वाहन चालक-वाहक कामावर रूजू झाल्याने तीन बसगाड्या बस आगारातून बाहेर काढण्यात आल्या.

 

एसटीच्या ७६ बसेस मुंबईकरांच्या मदतीस

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या आज दुसऱ्या दिवशी देखील मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून, मुंबईच्या रस्त्यावर मंगळवार (८ जानेवारी) ते बुधवार (९ जानेवारी) दिवसभर अशा ७६ बसेस दिवसभर धावत आहेत.
  • कुर्ला पूर्व ते माहूल – ०८
  • कुर्ला पश्चिम ते बांद्रा – ०८
  • घाटकोपर ते माहूर – ०३
  • पनवेल ते मंत्रालय – ०५
  • सीएसटी ते मंत्रालय – १०
  • सीएसटी ते कुलाबा – १०
  • कुर्ला पश्चिम ते सांताक्रूझ ०५
  • अंधेरी पूर्व ते स्पेस – ०५
  • दादर ते मंत्रालय – ०५
  • बोरवली ते सायन – ०२
  • ठाणे ते मंत्रालय – १५

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत बत्ती गुल, ग्रिड फेल्युअरमुळे पूर्ण मुंबईत वीजपुरवठा खंडित

News Desk

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk

कांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

News Desk