मुंबई | आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी ( ७ जानेवारी) मध्यरात्री पासून बेस्टचे ४५ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी आज (८ जानेवारी) सकाळी ११ वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली “बेस्ट युनियन” ची बैठक सुरू झाली होती. परंतु बेस्ट कृती समिती आणि बेस्ट प्रशासनाची बैठक निष्फळ, बैठकीतून कोणताही तोडगा नाही, संप मागे घेणार नसल्याची माहिती, शिवसेनेची कोणतीही ठोस भूमिका नसल्याचा बेस्ट कृती समितीचा आरोप केला आहे.
Mumbai: Bus services affected at the CSMT due to the indefinite strike by BEST(Brihanmumbai Electricity Supply&Transport) over demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences etc. pic.twitter.com/SXlTfiZDeB
— ANI (@ANI) January 8, 2019
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचे हाल झाले. बेस्टच्या संपाचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी शेअरच्या माध्यमातून दामदुप्पट भाडे आकारत आहेत. तर काहींनी चालत स्टेशन पर्यंत जाणे पसंत केले. चर्चगेट आणि सीएसएमटी येथे उतरून अनेकांनी दामदुप्पट भाडे देऊन आपल्या कार्यालयापर्यंत प्रवास केला.
या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा ‘क ‘अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ ‘अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- २०१६-१७ आणि १७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरू करावी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.