HW News Marathi
देश / विदेश

अन् मजूर झाला करोडपती

पन्ना | मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिऱ्यांची खाण म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. खाणीत काम करणा-या बेनीसार पन्ना या मजुराचे आता भाग्य उजळले आहे. बेनीसार याला ४२.५९ कॅरेटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याला पन्नाच्या बाजारातील आजवरची सर्वाधिक बोली लावण्यात आली असून हा हिरा चक्क २.५५ कोटींना विकला गेला. तर १२.५८ कॅरेटच्या हिऱ्याला ५४ लाख ३४ हजार रुपयांचा भाव मिळाला.

बेनीसार यांनी जिल्हा प्रशासनाकडून लीजवर खाण घेवून त्या ठिकाणी खाणकाम केली. या ठिकाणी बेनीसार यांना हिरा मिळाल्यानंतर तो जिल्हा हिरा अधिकारी यांच्याकडे जमा केला. यानंतर प्रशासन त्या हिऱ्यांचा लिलाव लावला. या लिलावाची आज (३१ डिसेंबर) शेवटची तारीख आहे. आता पर्यंत ४ कोटींचे हिरे विकले गेले आहेत.अद्याप पैलू न पाडलेला हा हिरा ९ ऑक्टोबरला कृष्णा कल्याणपूर ग्राम पंचायत हद्दीतील पटी येथील खाणीमध्ये मिळाला होता.

हिऱ्यावर कर किती टक्के कर आकारला जातो

हिऱ्यावरील कर हा विक्री किंमतीच्या ११.५ टक्के रॉयल्टी आणि एक टक्का आयकर एवढा कापला जातो. जर या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर त्याच्याकडून २० टक्के कर कापला जातो. पॅन कार्डनंतर जमा केल्यास त्याला एक टक्का रक्कम माघारी दिली जाते.

कोणीही लीजवर घेऊ शकतो खाण

या जमिनी प्रशासन शेतकऱ्यांकडून कराराने घेते. या जमिनी त्यांच्या शेताच्या बाजुला असतात. यामध्ये प्रशासनाकडून परवानगी मिळवून उत्खनन केले जाते व हिरा मिळविला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील, राहूल गांधींचा मोदींना टोला 

News Desk

हिमाचल प्रदेशातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी येत्या २६ जूनला राज्यात चक्काजाम आंदोलन ! पंकजा मुंडे आक्रमक

News Desk