HW News Marathi
राजकारण

असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे !

मुंबई | “असंख्य नवरे बोलत असतील..बायको शिवसेनेसारखी पाहिजे. लफडी कळली तरी सोडत नाही..जास्तच जास्त तर काय..एक सामन्यातून अग्रलेख. बाकी संसार सुरु”, असा टोला आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून नितेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. राजीनामा आणि स्वबळाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर सर्वच स्तरातून वारंवार टीका होत राहिली आहे. भाजपसोबत सत्तेत असूनही विरोधी पक्षासारखी भूमिका बजावत ‘सामना’तून शिवसेनेकडून वारंवार भाजपला लक्ष्य केले जाते. याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी शिवसेनेला सुनावले आहे.

आजच्या ‘सामना’मधून भाजप-राष्ट्रवादीवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले. २०१४ साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजेच भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

नितेश राणे यापूर्वी शिवसेनेबाबत काय म्हणाले होते ?

नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही नवा नाही. यापूर्वी देखील नितेश राणेंनी वारंवार शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांवर अनेकदा टीका केली आहे. “बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे…रामदास कदमच्या रुपात”, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी ट्विट करून केले आहे. ‘नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’, या रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी रामदास कदम यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली होती. त्याचप्रमाणे ‘जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, ते अयोध्येत राम मंदिर काय उभारणार ?’ असा खोचक टोला देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही योग्य वेळ नाही म्हणत लेखिका गीता मेहतांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

News Desk

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

Aprna