HW News Marathi
महाराष्ट्र

मेहुल चोक्सीप्रमाणे नील आणि किरीट सोमय्या देखील देश सोडून पळून गेले?, राऊतांचा सवाल

मुंबई | “मेहुल चोक्सीप्रमाणे किरीट सोमय्या देखील देश सोडून पळून तर गेले नाही ?, नील आणि किरीट सोमय्यांना कुठे लपवले ?, “असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊतांनी आज (११ मार्च) पत्रकार परिषदेत आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट आणि नील सोमय्यांसाठी लुकआउट नोटीस काढली जावी, अशी मागणी राऊतांनी केला आहे.

राऊत म्हणाले, “किरीस सोमय्यांनी राज्यात नव्हे तर राज्याबाहेरून देखील पैसे गोळा केले आहेत. या निधीचा १०० टक्के गैरवपार झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला आणि हे त्यांचा तपास करतील. या प्रकरणाचा कालपासून जबाब नोंदवणे सुरू झाले आहेत. हे दोन ठग कुठे आहेत?, आणि आता भाजपकडून कोणतीही माहिती काय येत नाही?, या दोघांना कुठे लवपले आहे?, या बापबेट्यांना महाराष्ट्राच्या बाहेर आहे. ते मी तुम्हाला सांगतो. मला अशी भीती वाटते की, जामीनाची व्यवस्था होत नाही, ते तोपर्यंत परदेशात पळू शकतात. या दोघांविरोधात लुकआउट नोटीस जाहीर केली पाहिजे. याचे कारण म्हणजे मेहुल चोक्सी आणि सोमय्यांचे खूप जुने नाते आहेत. यामुळे मग मेहुल चोक्सी आहे, तिथे तर नाही पळून गेले ना ते अँटीग्वामध्ये तर पळून गेले नाही.” 

दरम्यान, “मुंबई पोलीस तपास करत आहे, असे माझे मत आहेत. सोमय्या हे बोगस साक्षीदार तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत. मी राजभवनाला इशारा देत आहे. जर काही चुकीचे कामे केले आहे. तर राजभवनाची उरलीसुरली लाज देखील राहणार नाही. मुंबई पोलिसांनी सोमय्या जिथे कुठे असतील ना तिथून त्यांना लवकरता लवकर पकडा,” असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार!

News Desk

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

News Desk

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार! – डॉ. जितेंद्र आव्हाड

Aprna