HW News Marathi
राजकारण

गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली !

नवी दिल्ली | “गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली आहे”, असा दावा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केला आहे. सच्चर समितीच्या अहवालाचा दाखल देत विजय रुपाणी म्हणाले कि, “भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगली आहे”.

विजय रुपाणी यांनी २६ डिसेंबर २०१७ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला आज (२६ डिसेंबर) १ वर्ष पूर्ण होत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय रुपाणी यांच्याकडून तब्बल ६६६ कोटींच्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यावेळी काँग्रेसवर देखील सडकून टीका केली आहे. “काँग्रेसकडून कायमच हिंदू आणि मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो”, असा आरोप देखील विजय रुपाणी यांनी केला. ते राज्य वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वंचित बहुजन आघाडीचे बटण दाबले तरीही भाजपलाच मत ?

News Desk

‘महाविकासाआघाडी’ने स्पष्ट केली ‘किमान समान कार्यक्रमा’ची रूपरेषा

News Desk

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

News Desk
महाराष्ट्र

फ़ेसबुकवरील कुबेर ग्रुपचा आदर्श ; आजारी सदस्याला केली अवघ्या 2 दिवसात 3 लाखाची मदत

swarit

मुंबई फेसबुक हे आभासी जग असले तरी या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य होऊ शकते हे फेसबुक वरील कुबेर या समूहाने एका सदस्याला अचानक आलेल्या आजाराच्या संकटात 2 दिवसात 3 लाख रुपये मदत करून दाखवून दिले आहे.

संतोष लहामगे या संगमनेर च्या युवकाने फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील अनेक लोकं “कुबेर” नावाच्या ग्रुपवर एकत्र आनली. याच समूहाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल “तीन लाखांची” मदत गोळा करून समूहातील जयेश नलावडे या सदस्याचा उपचाराकरीता तातडीने दिली आहे. त्यामुळे, अशा या जीवनदायी मदतीचं उदाहरण देऊन या “कुबेर” समूहाने आपल्या समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

आतापर्यंत आपल्या वाचण्यात आणि पाहण्यात सोशल मीडियाचा वापर शक्यतो अपप्रचार किंवा अशांतता पसरवण्यासाठी केला जातो असंच आलेले आहे परंतु, याच गोष्टींना पुसत टाकत कुबेर समूहाचे संस्थापक संतोष लहामगे यांनी या सोशल मीडियाचं महत्व पटवून दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी जयेश नलावडे हा अचानक आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा आजार इतका वाढला की, त्याला अतिदक्षता विभागात केलं गेलं. जयेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती समूहाचालक संतोष लहामगे यांना लागली. त्यांनी जयेशला मदत करण्याचं आवाहन समूहातील सर्व सदस्यांना केलं. त्यांनंतर लगेचच समूह सदस्यांनी मदतीचा मानस ठेवत अगदी दोन दिवसात 3 लाख रुपये मदतनिधी म्हणून गोळा केला.

या कुबेर समूहामध्ये जवळपास दहा देशात विविध क्षेत्रात काम करणारी एकूण 1700 सदस्य असून, ते नेहमी सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात. यापूर्वीही अनेकांच्या मदतीला कुबेरकर धावून आलेले आहेत.त्यासोबत हा महाराष्ट्रातील असा फेसबुक समूह आहे ज्याचे आत्तापर्यंत “सहा संमेलन” पार पाडली आहेत. जलसंधारण कामात एक गाव दत्तक, फिरते वाचनालय, हेल्पलाइन, कलाकारांना व्यासपीठ, प्रकाशन संस्था, दिवाळी अंक असे अनेक उपक्रम राबवणा-या या ग्रुप ने शाळा सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

कुबेरकरांच्या मदतीचा हात हा जयेशसाठी जीवनदानच ठरला आहे. शनिवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी समूहाचे प्रमुख संतोष लहामगे यांनी जयेशच्या आईकडे पैसे सुपूर्द केले व त्यासोबतच कुबेर समूहाच्या कोणत्याही सदस्याच्या कसल्याही अडचणीला आम्ही एकत्र येऊन त्याला तोंड देऊ असा शद्ब संतोष लहामगे यांनी येताना दिला, त्यामुळे त्यांच्या या कुबेर समूहाचं आणि त्यांच्या अशा सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता!

News Desk

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

News Desk

बाळासाहेबांचे ‘हे’स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करूया,अजित पवारांची बाळासाहेबांना श्रद्धांजली!

News Desk