HW News Marathi
राजकारण

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आपले मन मोकळे केले. अटलजींनी लोकशाहीला व नात्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. म्हणूनच सत्तेवर नसलेल्या अटलजींचे नाव सदैव दुमदुमत राहिले. आज नात्यांना अर्थ उरलेला नाही व लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. इंदिरा गांधी यांनी सत्ता हाच ऑक्सिजन मानला तेव्हा त्यांचा पराभव झाला. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे. जेव्हा अटलजी बोलत तेव्हा देश बोलत असे. अटलजींची वाणी ही केवळ भाजपचीच वाणी नव्हती तर या देशातील सर्वसामान्य जनतेची ‘वाणी’ होती असे मोदी यांनी सांगितले ते खरेच आहे. आजच्या वातावरणात जनतेची ती वाणीच हरवल्यासारखे वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. अटल युगाचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अटल बिहार वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत, कोणत्याही व्यक्तीच्या कॉम्प्युटर व मोबाईल चौकशी करण्यासाठी आता गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार नाही, हेरगिरी करण्याचा अधिकार सरकारकडूनच मिळाला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा सामनाच्या संपादकीयमधून खरपूस समाचार घेतला आहे.

सध्याच्या मोदी सरकार लोकांच्या

सामनाचे आजचे संपादकीय

इंदिरा गांधी यांनी सत्ता हाच ऑक्सिजन मानला तेव्हा त्यांचा पराभव झाला. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे. जेव्हा अटलजी बोलत तेव्हा देश बोलत असे. अटलजींची वाणी ही केवळ भाजपचीच वाणी नव्हती तर या देशातील सर्वसामान्य जनतेची ‘वाणी’ होती असे मोदी यांनी सांगितले ते खरेच आहे. आजच्या वातावरणात जनतेची ती वाणीच हरवल्यासारखे वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. अटल युगाचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.

पंतप्रधान मोदी यांनी एक चांगले विधान केले आहे. ‘काहीजणांना सत्ता म्हणजे ऑक्सिजन असतो. सत्तेशिवाय ते जगू शकत नाहीत, तडफडत राहतात,’ असे श्री. मोदी म्हणाले. आता हे काहीजण म्हणजे नेमके कोण? याचाही खुलासा झाला तर बरे झाले असते. सत्ता हा आता काहीजणांचाच नव्हे तर सगळ्यांचाच ‘ऑक्सिजन’ बनला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी मन मोकळे केले. सध्या भाजपात ‘मोदी युग’ सुरू आहे. त्यामुळे मोदी म्हणतील तेच सत्य असे पक्षाचे धोरण आहे. कधीकाळी हे स्थान अटलजी व आडवाणींना होते. सत्ता हाच राजकारण्यांचा ऑक्सिजन आहे. रामायण आणि महाभारत हे सत्तेसाठीच घडले. तरी त्यात सत्य व असत्याची लढाई होती. ‘सत्ता’ हा काही प्रभू श्रीरामाचे ऑक्सिजन नव्हते. तरीही ते वनवासात राहिले व आजही वनवासीच आहेत. श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी रामाच्या नावावर रथयात्रा काढली व भारतीय जनता पक्षाचे कमळ देशभरात फुलवले. आजचे चित्र असे की, अयोध्येत प्रभू श्रीराम व राजकारणात आडवाणी हे वनवास भोगत आहेत व सत्तेच्या ऑक्सिजनवर दुसरेच जगत आहेत. एखाद्याला ठरवून वनवासात पाठवणे हे सत्तेचे राजकारण असते. जे सत्तेवर पोहोचतात त्यांना

आपल्याच माणसांची भीती

वाटते. मोगल राजांनीही सत्ता व सिंहासनासाठी आपल्या ‘बापां’ना तुरुंगात पाठवलं होतं. दिल्लीत तीच परंपरा आहे. राजकारणात विरोधी पक्षाला सत्ताधाऱयांइतकेच महत्त्व आहे. सत्ताधाऱयांना दिवसा ‘तारे’ दाखवणारा विरोधी पक्ष हाच देशाचा रक्षक असतो, पण विरोधी पक्षात बसणे म्हणजे वनवासात जाणे असे काहींना वाटते. सत्तेत राहूनही जे देशाला ‘अच्छे दिन’ देऊ शकत नाहीत त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटते. विरोधी बाकावर बसणे कमीपणाचे वाटते व ते विरोधात राहून सरकारच्या तंगडय़ा खेचत असतात. विरोधी पक्षही विधायक कार्य करू शकतो हे आपण कधी स्वीकारणार? अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या राजकीय जीवनातला जास्त काळ विरोधी पक्षातच घालवला. मात्र त्यांची शांत व समाधानी वृत्ती अढळ राहिली. ते कधीही विचलित झाले नाहीत. पण काही माणसे यांच्या अगदी उलट असतात असे मोदी सांगतात. म्हणजे ती काही माणसे कोण? हा प्रश्न आहेच. सत्तेचा ऑक्सिजन राहावा म्हणून गुंड, चोरांना शुद्ध करायचे. निवडणुका जिंकण्यासाठी ‘वाल्या’चा वाल्मीकी करून घ्यायचा ही शेवटी सत्तेचीच तडफड असते, साहेब. 2014 साली हिंदुत्ववादी शिवसेनेशी युती तोडायची हा प्रयोग

संपूर्ण सत्तेसाठीच

होता. त्यासाठी युतीच्या हिंदुत्वाचे ऑक्सिजनचे सिलिंडरच लुटण्यात आले. मात्र आता याच ‘ऑक्सिजन’च्या सिलिंडरच्या नळ्या जनतेने खेचून काढल्यामुळे शिवसेनेबरोबर ‘युती’ होणारच या स्वयंभू घोषणा केल्या जात आहेत. याचाच अर्थ ‘काहींना’ सत्ता म्हणजेच ऑक्सिजन असे जे श्री. मोदी म्हणत आहेत ते शंभर टक्के सत्य आहे. अटलजींनी लोकशाहीला व नात्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. म्हणूनच सत्तेवर नसलेल्या अटलजींचे नाव सदैव दुमदुमत राहिले. आज नात्यांना अर्थ उरलेला नाही व लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. इंदिरा गांधी यांनी सत्ता हाच ऑक्सिजन मानला तेव्हा त्यांचा पराभव झाला. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे. जेव्हा अटलजी बोलत तेव्हा देश बोलत असे. अटलजींची वाणी ही केवळ भाजपचीच वाणी नव्हती तर या देशातील सर्वसामान्य जनतेची ‘वाणी’ होती असे मोदी यांनी सांगितले ते खरेच आहे. आजच्या वातावरणात जनतेची ती वाणीच हरवल्यासारखे वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. अटल युगाचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk

एमपी मिल कंपाऊंड घोटाळा प्रकरण | मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा !

News Desk

#NoMoreModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंध्र प्रदेशातील सभेपुर्वी विरोधकांची पोस्टरबाजी

News Desk