HW News Marathi
महाराष्ट्र

बीड ऑनरकिलिंग प्रकरणात कट रचणारा पोलिसांच्या अटकेत

बीड | बहिणीबरोबर प्रेम विवाह केल्यामुळे सख्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची ऑनरकिलिंगची घटना बीडमध्ये (१९ डिसेंबर) घडली होती. या प्रकरणात खुनाचा कट रचण्यात सहभागी असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला बीड पोलिसांनी अटक केले असून सोमवारी (२४ डिसेंबर) न्यायालयात हजर केले जाणार आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ हे दोघे अद्याप फरार आहेत.

बीड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आसताना सुमित वाघमारे आणि भाग्यश्री लांडगे यांचे प्रेम सबंध जुळले. घरच्यांचा लग्नाला विरोध असतानाही दोन महिन्यांपूर्वी पळून जावून लग्न केले होते. दरम्यान १९ डिसेंबर रोजी भाग्यश्री आणि सुमित परीक्षा देण्यासाठी आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज येथे आले होते. यावेळी भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांनी सुमित वाघमारे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुमितचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघमारे पोलिसांना सापडलेले नाहीत. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर सर्व स्तारातून टीका होत असताना सोमवार सकाळी ऑनरकिलिंग प्रकरणाच्या कटात सहभाग असलेल्या कृष्णा क्षीरसागर याला पोलिसांनी अटक केली. कृष्णाला बेड्या ठोकल्याने मुख्य आरोपींपर्यंत पोलिसांना पोहचण्यास मदत होणार आहे. यामुळे तपासालाही गती आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जळगावात शिवसेना महिला कार्यकर्त्यांची दादागिरी आली समोर!

News Desk

मराठवाड्यातील खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी

News Desk

‘चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट,’ राजकीय चर्चांना उधाण!

News Desk
राजकारण

हनुमानाची जात सांगणे पडणार महागात

News Desk

नवी दिल्ली | राजस्थान विधानसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाच्या जाती विषयी बोलताना ते दलित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हनुमानजींच्या जाती विषयी वेगवेगळी वक्तव्ये करण्याच आली. दरम्यान हनुमानजींना कोणीतरी जाट म्हटले, तर कोणी त्यांना मुस्लिमांना म्हटले. सर्व नेत्यांनी त्यांच्या स्वत: च्या टीका आणि तर्कांच्या मागे सविस्तर स्पष्टीकरण देखील दिले होते.

परंतु आता अयोध्यामधील हनुमानगढच्या महंतांना राग आला असून त्यांनी हनुमान यांच्या जातीवर कोणत्याही प्रकारचे भाष्य केल्यास त्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की जर एखाद्या नेत्याने हनुमानजींच्या जातीवर टिप्पणी केली तर मी त्याच्याविरुद्ध खटला दाखल करेन.

अयोध्याच्या हनुमानगढ़ीमंदिराचे मुख्य पुजारी महंत राजू दास म्हणाले, भगवान हनुमान यांना धर्म जाती मध्ये वाटून घेण्याचे काम जे पण नेते करत आहेत, जातींमध्ये देवाचे विभाजन करणे हे त्या नेत्यांना भारी पडणार आहे. मी त्यांच्या विरूद्ध तक्रार करणार आहे. जर नेता भारतीय जनता पक्षाचा असेल तर मी या प्रकरणाची वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगेन.

हनुमानजींच्या जातीवरील विवादानंतर नेत्यांनी त्यांना आदिवासी, दलित, मुस्लिम, ब्राह्मण व जाट या जातीचे असल्याचे म्हटले आहे. भाजपचे बंडखोर खासदार किर्ती आझाद यांनी आतापर्यंत असेही म्हटले आहे की, आता चीनचे लोक हनुमानजी आपले असल्याचा दावा करत आहेत. चीनी म्हणत आहेत की ते त्यांचा देव आहेत.

Related posts

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk

‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणात आता नवे ट्विस्ट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Aprna

प्रतीक शिवशरण या ९ वर्षांच्या मुलाच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी !

News Desk