HW News Marathi
राजकारण

जदयुच्या एका आमदाराचा राजीनामा

मुंबई | बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे आमदार बहादुर सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते नितीश कुमार यांच्या सरकारवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काल रात्री त्यांनी आपला राजीनामा प्रदेश अध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांच्या घरी जाऊन दिल्याची माहीती प्राप्त झाली आहे. परंतु वशिष्ठ नारायण हे दिल्ली मध्ये असल्यामुळे त्यांची चर्चा होऊ शकलेली नाही.

श्यामबहादुर सिंह यांनी राजीनाम्याचे कारण सिस्टीम मध्ये गडबड असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की पंचरूखीमध्ये बंद असलेली साखर कारखाण्याची जमीन भू माफियाकडून गिळंकृत केली जात आहे. जेव्हा गरीब लोकांनी याविरुद्ध निषेध केला तेव्हा खोट्या प्रकरणात 200 लोक दोषी ठरवले गेले. या कारणांमुळे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला आहे. श्याम बहादुरला इतर कोणत्याही पक्षाकडे जातील असा अंदाज होता परंतु तुर्तास त्यांना यावर कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग झाला सोपा ?

News Desk

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा करणार !

News Desk

RamMandir : भाजप जो विचार करते, तोच विचार शिवसेनाही करत आहे !

News Desk