HW News Marathi
राजकारण

मायावतींसह अखिलेश यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

नवी दिल्ली | नुकत्या पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेशसह छत्तीसगडमध्ये सत्ता काबीज केली आहे. या तिन्ही राज्यात आज (१७ डिसेंबर) मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. राजस्थानमध्ये सकाळी अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये दुपारी १.३० वाजता तर छत्तीसगढमध्ये भुपेंद्र बघेल यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव काँग्रेसच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसच्या या तिन्ही राज्याच्या शपथविधी सोहळ्यात विरोधाकांच्या एकता दाखविण्याची संधी होती. ही एकता दाखवून भाजपच्या मानात लोकसभा निवडणुकीआधी भितीचे वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मायावती आणि अखिलेश यांनी हणून पाडला आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, राजद नेते तेजस्वी यादव, तृणमुल काँग्रेस नेते दिनेश त्रिवेदी, एलजेडी नेते शरद यादव यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे, काही लोकांना सवय असते”, उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोमणा

Aprna

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातला; कॉंग्रेसचा आरोप

Manasi Devkar

“…ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही”; राऊतांच्या सुटकेवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

Darrell Miranda