HW News Marathi
राजकारण

सचिन पायलट यांच्या समर्थकांनी अडविला रस्ता

रायपूर | राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम असल्याची चिन्हे दिसत आहे. काँग्रेसकडून अद्याप राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेवाराची घोषणा केली नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी मिळविला आहे. राजस्थानच्या यशात युवा नेता सचिन पायलट यांचा सिंहाचा वाट आहे. या विजयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेता अशोक गेहलोत आणि युवा नेता सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्री पदासाठी चांगलच लढत पाहायला मिळत आहे. पायलट मुख्यमंत्री व्हावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी करौली येथे रास्ता रोख केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री व्हावे अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच पायलट जर मुख्यमंत्री नाही झाले तर काँग्रेस सोडू असा इशारा अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्र घेत राज्यातील प्रदेश कार्यालयासमोर बुधवारी (१२ डिसेंबर) जोरदार घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री पदाचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जो घेईल. तो आम्ही मान्य करू असे सचिन पायलट म्हटले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी लवकरच मंत्री मंडळात असेन | नारायण राणे

Adil

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

swarit

पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीच

News Desk