HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह राजेंद्र भागवत यांना पुसद न्यायालयाने जारी केले वॉरंट

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत आणि मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत काल (२२ एप्रिल) यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद न्यायालयाने वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोक न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चावर दै. सामनामधून वादग्रस्त व्यंगचित्राद्वारे उपहासात्मक टीका करण्यात आली होती. या प्रकरणी त्याविरोधात अपमान केल्याची तक्रार पुसदचे अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. उद्धव ठाकरे, संजत राऊत आणि इतर लोक न्यायालयाकडून समन्स बजावूनही मुद्दाम प्रकरण लांबवण्याच्या हेतूने न्यायालयात हजर राहत नाहीत. अशा परिस्थितीत वॉरंटचा आदेश पारित करणे आवश्यक असल्याचे फिर्यादीच्या वकिल सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींवर मानहानीचा दावा

Gauri Tilekar

एसटी कर्मचा-यांचे तडकाफडकी निलंबन

News Desk

छोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी

News Desk