HW News Marathi
शिक्षण

पुणे विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द

पुणे | पुणे विद्यापीठमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’चे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी आवश्यक निधी आणि संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास पुणे विद्यापीठ असमर्थ ठरले आहेत. ‘इंडियन हिस्ट्री कॉंग्रेस’चे अधिवेशन २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. परंतु निधी उपलब्ध नाही आणि अधिवेशनालाठी पुण्यात येणाऱ्या इतिहास संशोधकांच्या राहण्याची व्यवस्था करणे अशक्य कारण देत हे अधिवेशन रद्द करण्यात आले आहे.

जवळपास ५५ वर्षांनंतर ही अधिवेशन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयोजित करण्यात येणार होती. या अधिवेशनात देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते. परंतु अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सदस्यांनी पुणे वि्दयापीठाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व गेस्ट हाऊस बुक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु खेलो इंडिया कार्यक्रम आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन यातील तारखांमध्ये तफावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही काळात पुराणातल्या गोष्टी इतिहास म्हणून सादर करण्याला आणि त्याआधारे इतिहासाचे पुनर्लेखन करण्याला विरोध होत आहे. इंडियन हिस्ट्री काँग्रसने या गोष्टींना सातत्याने विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे हे अधिवेशन रद्द करण्यात आले का, हा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिवेशन रद्द झाल्यानंतर इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या सदस्यांनी भरलेली प्रत्येकी दोन हजार रुपयांची फी परत मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापकांची मेगा भरती

News Desk

हिंदी आणि भारतीय भाषा वाचवणार, प्रकाश जावडेकरांचे आश्वासन

News Desk
राजकारण

आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ? पायलट यांच्या समर्थकांचा सवाल

News Desk

नवी दिल्ली | “सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी प्रचंड कष्ट केले आहेत. त्यामुळे जर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले नाही तर आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार”, असा इशारा राजस्थानातील आमदार पी. आर. राणा यांनी दिला आहे. त्याचसोबत, “आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ?”, असा सवालही राणा यांनी केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. परंतु, आता राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करताना मोठा पेच निर्माण झाला आहे.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांची नावे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुचविली जात असून या दोन्ही नेत्यांचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत. “राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. राजस्थानात निम्म्याहूनही अधिक आमदारांचे सचिन पायलट यांना समर्थन आहे. त्यामुळे तेच राजस्थानचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असे पी.आर.राणा यांनी म्हटले आहे. सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीला बोलावून घेतले असून राजस्थानचा मुख्यमंत्री कोण याबाबतच निकाल आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची, शक्यता आहे. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

Aprna

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय

News Desk