HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे मॅरेथाॅनमध्ये झिके अटलाव डेबेबे विजयी 

पुणे | ३३ वी पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (२ डिसेंबर) उत्साहात पार पडली. या मॅरेथाॅनमध्ये इथिओपियाच्या झिके अटलाव डेबेबे याने बाजी मारली असून महिलांमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने शर्यत जिंकली आहे. सारसबागेजवळील सणस क्रीडांगणापासून पहाटे ५ वाजता. या मॅरेथाॅनला सुरुवात झाली होती. झिके अटलाव डेबेबेने २ तास १७ मिनिटे १७ सेकंदाचा वेळ नोंदवत ही स्पर्धा जिंकली. तर इथिओपियाचा गतविजेता बेशा गेटाचेव याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने २ तास ५० मिनिटे व २७ सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.

विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश करण्यात आला होता. पुणेकरांनी सर्वच अंतरातील स्पर्धेसाठी उत्साह दाखवला. सामाजिक जाणीवांचे भान ठेवून आणि सामाजिक जनजागृतीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन १९८३ पासून दरवर्षी ही स्पर्धा तितक्याच उत्साहाने पार पडते. दरम्यान, या वर्षीच्या स्पर्धेमध्ये इथिओपियन धावपटूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत १०२ परदेशी नागरिकांसह १५००० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना सरकार स्थापन करण्यास अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट ?

News Desk

राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार !

News Desk

“आमचे तोंड उघडले तर…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Aprna