HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशसह राजस्थानमध्ये मायावती ‘किंगमेकर’

नवी दिल्ली | राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. मायावतीच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचा दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. मायावतीने दोन्ही राज्यात पाठिंबा देताना म्हटले की, दोन्ही राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या असून, बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन जाग्यांची गरज होती. तसेच मायावतींच्या बसपाच्या मध्य प्रदेशमध्ये दोन जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्याने काँग्रेसला बहुमताएवढे संख्याबळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे मायावती या निवडणुकीत किंगमेकर ठरली आहे.

मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११६ जागांची गरज आहे. भाजप किंवा काँग्रेस यापैंकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. तर मायावतींच्या बसपाला ६ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्यावर काँग्रेसही राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करू शकणार आहे. राजस्थानात बहुमतासाठी १०० जागांची आवश्यकता असून, मायावती आणि काँग्रेसच्या जागांची संख्या १०५ होते आहे. त्यामुळे साहजिकच या राज्यातही काँग्रेसची सरकार येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं !

News Desk

राहुल गांधींनी मोदींना ‘जादू की झप्पी’ नव्हे, ‘झटका’ दिला | संजय राऊत 

News Desk

यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणजे एम. करुणानिधी | ठाकरे

News Desk