HW News Marathi
राजकारण

#Results2018 : मध्य प्रदेशमध्ये मायावती किंगमेकर ठरणार ?

नवी दिल्ली | मध्य प्रदेशात काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. प्रत्येक सेकंदाला आघाडीचा आकडा बदलत आहे. मध्य प्रदेशात २३० विधानसभा सदस्य असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ११६ चा आकडा आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार काँग्रेस ११०, तर भाजप १०८ जागांवर आघाडीवर आहे.

या चुरशीच्या लढाईत बहुमताचा आकडा गाठण्यास भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांना अपयश आल्यास बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशात आठ जागी बसप उमेदवार आघाडीवर आहेत.

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पैकी नक्की कोणत्या पक्षासोबत मिळून मायावती सत्ता स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. बसप आणि अपक्षांच्या वाट्याला जितक्या जागा जातील तितका अधिक फटका सत्ताधारी भाजप आणि सत्तेची स्वप्न पाहत असलेल्या काँग्रेससाठी असणार आहे. तर अपक्ष सहा ठिकाणी आघाडीवर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

News Desk

दिग्विजय सिंह यांच्या रोड शोदरम्यान पोलिसांच्या गळ्यात भगवे उपरणे

News Desk

प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर

News Desk
व्हिडीओ

मिझोरामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत?

News Desk

मिझोरममध्ये राज्यातील 40 जागांवर आज मतमोजणी होत आहे. मिझोरममधल्या मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जेणेकरून मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) म्हणजेच एमएनएफ सत्ता हस्तगत करण्याची शक्यता आहे.

Related posts

Deepak Pandey यांना भोंग्यांसंबधीचा ‘तो’ निर्णय भोवला?, IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे काय कारण?

News Desk

उदयनराजे भोसलेंचा ‘हा’ धक्का भाजप आणि महाविकासआघाडीला सहन होणार का?

News Desk

मंत्री Prajakt Tanpure अडचणीत! तब्बल १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त | MVA | BJP

News Desk