HW News Marathi
व्हिडीओ

छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

काँग्रेस 58 जागांवर पुढे असून, भाजपा काँग्रेसच्या तुलनेत मागे पडलं आहे. तर भाजपा 26 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला आहे. अजित जोगी आणि मायावतींची आघाडी दोन जागांवर पुढे असून, अजित जोगींनाही जनतेनं सपशेल नाकारलं आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपाच्या रमण सिंह यांचं सरकार आहे. रमण सिंह यांनी सत्ता काळात गोरगरिबांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे जनमानसांत त्यांची चावलवालेबाबा अशीही प्रतिमा तयार झाली होती. परंतु त्यांच्या या प्रतिमेचा भाजपाला फायदा झाला नाही. तसेच त्यांनी नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये आदिवासींसाठी अनेक योजना पोहोचवल्या होत्या. परंतु तरीसुद्धा भाजपाला जनतेनं झिडकारलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं; Sudhir Mungantiwar यांचा सल्ला

News Desk

महागाईवर प्रश्न विचारताच Kirit Somaiya भडकले

News Desk

आशिष शेलारांनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला म्हणाले…

News Desk