HW News Marathi
देश / विदेश

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

श्रीहरिकोटा | भारतातने अंतराळ विश्वात नवी भरारी घेतली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४३ चे आज (२९ नोव्हेंबर) सकाळी ९.५८ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. भारताने आतापर्यंत पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे. या ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत.

अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या ८ देशांचे हे उपग्रह असणार आहेत. या उपग्रहासह अवकाशात झेपावणाऱ्या ३० विदेशी उपग्रहांपैकी एक मायक्रो तर २९ नॅनो उपग्रह आहेत. सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही – सी ४३ च्या उड्डाणाचे काउंटडाऊन बुधवारी पहाटे ५.५८ वाजता सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी ९.५८ वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. पीएसएलव्ही सी – ४३ मोहीमेचा हा प्राथमिक उपग्रह आहे. हा उपग्रह सूर्याच्या कक्षेत ९७.९५७ अंशात फिरणार असून ५ वर्ष कार्यरत राहणार आहे. सोबत भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटदेखील अवकाशात झेपावणार आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदुषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचं वजन ३८० किलो एवढे आहे. दरम्यान, पीएसएलव्हीचे हे ४५ वे उड्डाण आहे. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. इस्त्रोने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वाधिक १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान झाले शांतिदूत

Gauri Tilekar

BiharElection- भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर, मोदी पहिल्या स्थानी

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या शिफारशीला मंजुरी

News Desk