HW News Marathi
मुंबई

तुकाराम मुंढेची बदली, मंत्रालयात सहसचिवपदी नियुक्ती

मुंबई | धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिकहून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची बदली आता मुंबईत मंत्रालयात सहसचिवपदी करण्यात आली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केल्याचे पत्र तुकाराम मुंढे यांना प्राप्त झाले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देशही मुंढे यांना देण्यात आले आहेत. तर नाशिकचा पदभार उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे स्वीकारणार आहेत. मुंबईतील नियोजन विभागाचे सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. बदलीचे पत्र मिळताच मुंढे यांनी आपले कार्यालय सोडले असून मुंबईत रुजू झाले आहे. यापूर्वी २०१० आणि २०१२ मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती.

नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली होती. अाॅगस्ट महिन्यात मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्नही करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेत्यांना समज देत हा ठराव मागे घ्यायला लावला हाेता. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पुर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढेंची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ती केवळ अफवाच असून मुंढेंना मंत्रालयातच नियुक्ती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

News Desk

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

News Desk

“न्यूज 18-लोकमत”च्या मालक, संपादक, वार्ताहराविरुद्ध विधान परिषदेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल

News Desk
राजकारण

रामाच्या नावाने चांगभलं…

News Desk

देवाच्या नावाने भीक मागणे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु देवाच्या नावाने मतं मागणं आणि त्याच्या नावाने राजकारण करणं हे काहीतरी भलतचं आहे… सध्या भारताच्या राजकारणात “रामाच्या नावाने चांगभलं” हा ट्रेंड सुरू झाला आहे आणि त्याला राष्ट्रीय, प्रादेशिक आणि हिंदू संघटनांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय खतपाणी मिळत आहे…

भाजपाचे नेते राम मंदिरासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राम मंदिर उभारण्यासाठी महाराष्ट्रासोबतच देशाचे राजकारण ढवळून काढत आहेत… उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार”, असा नवा नारा देऊन २४ आणि २५ नोव्हेंबरला राम जन्मभूमी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत तर एकीकडे राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहेत… या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला… तर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सीपी जोशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस अयोध्येत राममंदिर बांधणार असल्याचे सांगत आहेत…

मुळातच देशात दुष्काळ, रोजगार, महिला सुरक्षा, देशातील अंतर्गत सुरक्षा, काश्मीर प्रश्‍न, शेतकर्‍यांची कर्जमाफी हे प्रश्न असताना भाजपा सरकार पुतळे उभारण्यात, शहरांची नावं बदलण्यात आणि आता राममंदिर बांधण्यात राजकारण करत आहे…महाराष्ट्रात सुद्धा दुष्काळ, आरक्षण, शेतकरी-आदिवासी मोर्चा हे विषय गाजत असताना शिवसेना सुद्धा या विषयांना तिलांजली देऊन राममंदिराच्या मुद्दयाला अधिक महत्त्व देताना दिसत आहे…देशातील जनता आता सुज्ञ आणि सुशिक्षित झालेली आहे त्यामुळे “देवाच्या नावाने मतं मागणं” राजकीय पक्षांना येणार्‍या निवडणूकीत महागात पडू शकेल यात शंका नाही…

Related posts

राज्यातील तरुणाईच्या जोरावर आम्ही पुन्हा स्वराज्य स्थापन करणार !

Gauri Tilekar

“आम्हाला बोलविताना त्यांना भाजपसोबत देखील चर्चा करावी लागेल,” दीपक केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

Aprna

विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही !

News Desk