HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट

नवी दिल्ली | मुंबईत आज पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत १६ तर डिझेलच्या किंमतीत १३ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८३.२४ रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७५.९२ रुपये एवढी झाली आहे. नवी दिल्लीत देखील पेट्रोल १६ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७७.७३ रुपये आणि तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७२.४६ रुपये एवढी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशातील इंधनाच्या किंमतींवर परिणाम होत असतो. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस सलग देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. शिवाय, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार मतांचे राजकारण करीत असल्याच्या देखील चर्चा रंगात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीत आशिष शेलारांनी घेतली शरद पवारांची भेट!

News Desk

“…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला इशारा!

News Desk

“मुसलमानाचा DNA इथलाच आहे, बाळासाहेब ठाकरे पण हेच सांगायचे!”, सेनेचा भाजपला टोला

News Desk