HW News Marathi
मुंबई

म्हाडाच्या घरांची १६ डिसेंबरला लॉटरी सोडत

मुंबई । म्हाडा मुंबई मंडळाच्या १३८४ घरांची १६ डिसेंबरला सोडत. घरांच्या लॉटरीसाठी शुक्रवारपर्यंत १७,७९५ अर्ज दाखल झाले आहेत. म्हाडाची वेबसाईट वापरणाऱ्यांची संख्या ५० हजार होती,असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी एकूण १०,८७५ अर्जदारांनी आॅनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे. परंतु कोकण मंडळाच्या लॉटरीला अल्प प्रतिसादा मिळाला होता, त्या तुलनेत मुंबई मंडळाला आॅनलाईन लॉटरीत अर्जदारांनी चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. म्हाडाने यावर्षी लॉटरीतील घरांसाठी किंमतीचे नवीन धोरण आखले आहे.

घरांच्या किमती या वर्षी २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे अल्प आणि अत्यल्प गटात मोडणाऱ्या अर्जदारांना याचा मोठा फायदा झाला आहे. या लॉटरीची आॅनलाईन अर्जासाठी नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबरपर्यंत आहे. मुंबई मंडळातील आॅनलाईन लॉटरी नोंदणीला ५ नोव्हेंबरला सुरवात झाली आहे. गेल्या ४ दिवसात १३८४ घरांसाठी अर्जदारांनी सकारात्मक चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षण उपसंचालकाला ११वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या मुदतवाढीसाठी घेराव.

News Desk

फेरीवाल्यांनी मनसे पदाधिका-यालाच झोडपले

News Desk

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

News Desk