HW News Marathi
मनोरंजन

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

मुंबई | रीगल सिनेमागृह हे मुंबईतील सर्वात जुने सिंगल स्क्रिन आणि वातानुकूलित असे पहिलेच सिनेमागृह आता लवकरच बंद होणार आहे. गेली ८५ वर्षे जुने असलेले हे सिनेमागृह आर्थिक नुकसानीमुळे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या एका वर्षांत या रीगल सिनेमागृहाला जवळपास एक कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा कॉजवेजवळ असणारे रीगल सिनेमागृह लवकरच बंद होणार आहे.

या सिनेमागृहाची ११६० सीट्सची क्षमता असलेले सिनेमागृह असून व्यापार घसरून १५ ते २० टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील मल्टिप्लेक्सचाही या सिनेमागृहावर परिणाम झाला आहे. मल्टिप्लेक्स तिकिटांच्या पाचशे ते हजार रूपयांच्या तुलनेत रीगलचे दर दिडशे ते अडीचशे रूपये इतके आहे. हे सिनेमागृह ब्रिटीशकालीन असलेल्या या दोन मजली सिनेमागृहात आणखी दोन स्क्रिन आणि एक फूड कोर्टबाबत बोलणी सुरू आहेत. परंतु याबाबत कोणताही प्रतिसाद न आल्याचे कमल सिधवा तारापोरवाला यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार ?

News Desk

अबू धाबीत पार पडला दिमाखदार गणेशोत्सव

News Desk

असा महात्मा होणे नाही…

swarit