उस्मानाबाद | ‘राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही आज ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला’, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी(६ नोव्हेंबर)ला उस्मानाबादमध्ये सांगितले. जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री आज (६नोव्हेंबर)ला उस्मानाबाद जिल्ह्यात आढावा बैठक बोलवली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजनां करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. पुढे ते असे देखील म्हटले की, याआधी कोणीच दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली नाही.
We are working on all kinds of assistance for drought affected regions.
Also drafted a proposal requesting an assistance of ₹7000 crore from GoI: CM @Dev_Fadnavis
#Osmanabad pic.twitter.com/uoGnMz40x6— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 6, 2018
आमच्या सरकारने ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी नाबार्डकडे २२०० कोटींची मागणी केली असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला असून तो डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल आणि जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.