HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा घट

मुंबई | आज पुन्हा पेट्रोल १४ पैसे तर डिझेल १० पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ८३.९२ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७६.५७ रुपये एवढे झाले आहेत. राजधानी दिल्लीत देखील आज पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल ७ पैशांनी स्वस्त आले आहे. दिल्लीत आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ७८.४२ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर दर ७३.०७ रुपये एवढी आहे.

गेले अनेक दिवस सलग इंधनाच्या किंमतींमध्ये घट होत आहे. मध्यंतरीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती. तसेच गेले अनेक दिवस सातत्याने होणाऱ्या या इंधन दरकपातीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल

News Desk

कोणी केली केरळला अर्थिक मदत, जाणून घ्या…

News Desk

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

News Desk