HW News Marathi
राजकारण

फडणवीस सरकारकडे क्रीडा क्षेत्रासाठी चांगली बातमी

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची आज बैठक घेतली. या बैठकीत आठ महत्वाची निर्णय घेण्यात आली. ‘खेलो इंडिया-क्रीडा विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम योजने’ची केंद्र शासनाने २०१८-१९ पासून राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे आयएनएस विराट या युद्धनौकेचे लवकरच वस्तुसंग्रहालयात रुपांतरित करण्यात येणार आहे. निधी प्राथमिक आश्रमशाळांना श्रेणीत वाढ करून माध्यमिक आश्रमशाळा करणे तसेच माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी लागणा-या पदनिर्मिती व अनुषंगिक खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

 

फडणवीस मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मोठे निर्णय

– केंद्र शासनाची खेलो इंडिया-क्रीडा विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम या योजनेची २०१८-१९ पासून राज्यात अंमलबजावणीला

– राज्यातील शासकीय जमिनीवर क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या भाडेपट्टे नूतनीकरणाबाबतचे धोरण निश्चित

– आयएनएस ‘विराट’ ही युद्धनौका होणार वस्तुसंग्रहालयात रुपांतरित

– जीएसटी भरपाई अनुदान देताना आधार वर्ष महसुलाचे सूत्र प्रतिकूल ठरणा-या महापालिकांच्या प्रकरणांमध्ये अनुदान मंजुरीचे अधिकार राज्य शासनाला मिळण्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणेचा अध्यादेश

– शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालयांची बांधकामे आता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करून घेता येणार, यामध्ये २५ कोटी व त्यापेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांचाही समावेश

– शासकीय प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळांचे श्रेणीवाढ करण्याबरोबरच संलग्न माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासह आवश्यक पदनिर्मिती व अनुषंगिक खर्चास मान्यता

– अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून माध्यमिक आश्रमशाळा करणे व माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी लागणा-या पदनिर्मिती व अनुषंगिक खर्चास मान्यता

– – जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेसाठी भंडारा जिल्ह्यातील मौजा पाचगाव(ता. मोहाडी) येथील ८.८० हेक्टर इतकी शासकीय जमीन नाममात्र भुईभाडे आकारून ३० वर्षांसाठी देण्यास मंजुरी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरच्या सभेत सविस्तर बोलेन | राज ठाकरे

News Desk

छोट्या दुकानदारांना दिलासा; पॅकेजिंगसाठी प्लास्टिक वापरण्याची परवानगी

News Desk

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar