HW News Marathi
राजकारण

तेलंगणातील मुदतपूर्व निवडणुकांना माओवाद्यांचा विरोध

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकांना फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या निवडणूक ७ डिसेंबरला पार पडणार आहेत. मात्र, या निवडणुकांवर सध्या माओवादी हल्ल्याचे वादळ घोंघावत आहे. तेलंगणा परिसरातील माओवाद्यांनी या मुदतपूर्व निवडणुकांना आपला विरोध दर्शविला आहे. मुदतपूर्व निवडणुका घेणे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे येथील माओवाद्यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर माओवाद्यांकडून येथील अनेक जिल्ह्यात राजकीय पक्षांविरुद्ध पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

एक धक्कादायक बाब म्हणजे, उत्तर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कुठेही माओवादी हालचाली नसल्याचे सांगितल्यानंतर काहीच वेळानंतर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. चंद्रशेखर राव यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तेलंगणाचे सरकार बरखास्त केले आहे. त्यामुळे ७ डिसेंबरला तेलंगणात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. परंतु, या मुदतपूर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन माओवाद्यांकडून केले जात आहे. माओवाद्यांकडून टीआरएस, भाजप, काँग्रेस आणि तेलंगणा जन समिती या राजकीय पक्षांविरुद्ध पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदेंच्या बंडात मदत करणाऱ्या ‘या’ नेत्यांच्या पदरी ‘मंत्रिपद’ पडणार?

Manasi Devkar

भाजपाचे सुरेश धस विजयी, धनंजय मुंडेंना धक्का

News Desk

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी दाखल, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

News Desk