HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई | अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने वारंवार जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे ? असा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जात होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही राज्यातील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाईल, असे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले होते. या घोषणेनंतर आता केंद्र सरकारचे पथक लवकरच दुष्काळसदृश भागांची पाहणी करणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

“सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा,” अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली होती.

“सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे.भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

News Desk

कोरोना व्हायरसमुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार

swarit

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार! – एकनाथ शिंदे

Aprna
राजकारण

घर का भेदी लंका ढाये

Gauri Tilekar

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेस पक्षाला होणाऱ्या लोकसभा निवडणुकेत पाठिंबा सादर केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा विरोधी अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी उपस्थित राहणार आहेत. प्रल्हाद मोदी यांच्या ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनने तृणमूल काँग्रेसला आपला पाठिंबा दिसून येत आहे. या फेडरेशनचे अध्येक्ष नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी असल्याने ही बाब विशेष आहे.

प्रल्हाद मोदी ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला प्रल्हाद मोदींनी आपला पाठिंबा सादर केला आहे. प्रल्हाद मोदी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर करण्याची घोषणा ३० ऑक्टोबरला पश्चिम बंगाल सरकारने खाद्य साथी योजनेवर आयोजित केलेल्या चर्चेच्या बैठकीत फेडरेशनकडून केली आहे. ही घोषणा फेयर प्राइस शॉप ऑनर्स फेडरेशनचे सचिव बिश्वंभर बसु यांनी केली. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात मोदी विरोधी अभियान सुरू आहे हे अभियान फेडरेशनचे सदस्य करणार आहेत. काँग्रेस पक्ष टीएमसीच्या मदतीने मोदी सरकारला पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Related posts

निवडणूक आयोग भाजपला मदत करत आहे का ?

News Desk

राज्यामधील ५४७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात; आज निकालानंतर 16 जिल्ह्यांना सरपंच मिळणार

Aprna

धैर्यशील मानेंनी घेतला राजू शेट्टींच्या मातोश्रींचा आशीर्वाद

News Desk