HW News Marathi
राजकारण

राज्यामधील ५४७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात; आज निकालानंतर 16 जिल्ह्यांना सरपंच मिळणार

मुंबई | राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार काल (18 सप्टेंबर) सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या 16 जिल्ह्यांच्या 547 ग्रामपंचायतीत निवडणुकांचा आज (19 सप्टेंबर) येणार आहे. पहिल्यांदाच नागरिकांमधून थेट सरपंचपदाची (sarpanch )निवड होणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होईल. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यामुळे शिंदे सरकारला ग्रामपंचायतीची निवडणूक महत्वाची मानली जाते.

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी काल सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

 

Related posts

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

News Desk

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

Gauri Tilekar

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा विधानभवनावर धडकणार

News Desk