HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनससाठी बेमुदत धरणे आंदोलन

मुंबई | मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनने बेस्ट कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये बोनस मिळावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारादेखील युनियनकडून देण्यात आला आहे. वडाळा आगर परिसरात उद्या (गुरुवार) सकाळी साडेअकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट कर्मचाऱ्यांना उचल रक्कमेऐवजी पंधरा हजार रुपये बोनस १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बेस्ट समितीच्या सभेत जाहीर करण्यात यावा. याबाबतचे निवेदन बेस्टचे महाव्यवस्थापक, बेस्ट समितीचे चेअरमन आणि बेस्ट समिती सदस्यांना दिले असल्याचे विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सपा उमेदवारांनाच निवडून द्या अबू आझमी यांचे आवाहन

News Desk

पोलिस मुख्यालयात सर्वसामान्यांना मज्जाव

News Desk

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

swarit