नवी दिल्ली। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिक्रियेवरून नवीन वादळ उभ राहण्याची शक्यता आहे. ब्रिटिश डेब्यूट हाय कमिशन आणि ऑब्सर्व्हर्स रिसर्च फाऊन्डेशन आयोजित परिषदेत स्मृती इराणी यांनी आपले मत मांडले आहे. “मासिकपाळीवेळी तुम्ही रक्ताने भरलेले सॅनेटरी बॅड तुमच्या मित्राच्या घरी न्याल का ? नाही ना. मग देवाच्या दारी का ?”, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला होता.
As far as those who jump the gun regarding women visiting friend’s place with a sanitary napkin dipped in menstrual blood — I am yet to find a person who ‘takes’ a blood soaked napkin to ‘offer’ to any one let alone a friend: Smriti Irani. (4/5)
— ANI (@ANI) October 23, 2018
या सर्व प्रकारानंतर स्मृती इराणी यांनी अजून एक व्हिडीओ पोस्ट केला . या व्हिडीओमध्ये, त्यांना मुंबईतील अग्यारीमध्ये प्रवेश नाकारला होता. तर तेव्हा त्या कारमध्ये बसून आपल्या पतीची व मुलाची त्याची वाट पाहत बसल्या होत्या. यावेळी, दोन झोराष्ट्रीयन मुलांची आई असल्या कारणाने आणि पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी मी कोणत्याही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला नाही. त्या उलट ‘मी झोराष्ट्रीयन समाज आणि त्यांच्या पुजाऱ्यांचा आदर करते. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिराबाबतीत दिलेल्या निकाला विषयी माझे कोणतेही दुमत नाही. मला शबरीमला मंदिरासंबंधी जे विचारण्यात आले होते त्यावर मी माझे मत सांगितले. माझ्या बोलण्याचा व माझा अपप्रचार केला जात आहे.
Since many people are talking about my comments — let me comment on my comment. As a practising Hindu married to a practising Zoroastrian I am not allowed to enter a fire temple to pray: Union Minister Smriti Irani clarifies on her comment. (1/5) (File pic) pic.twitter.com/h0p06XS39b
— ANI (@ANI) October 23, 2018
शबरीमला मंदिरात १० ते ५० वयातील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला. मात्र सोमवार पासून पुन्हा महिलांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याकाळात मंदिराच्या गाभाऱ्यात १० ते ५० वयातील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.