HW News Marathi
मुंबई

जेव्हीएलआरला ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव मंजुर

मुंबई | जोगेश्‍वरी (पुर्व) येथील जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड म्हणजेच जेव्हीएलआर येथील रस्त्याला ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ याबाबतचा ठराव ३ ऑक्टोबर १९९४ रोजीच पालिकेने मंजुर केला आहे. त्यावेळी नगरसेवक असताना तत्कालिन नगरसेवक व विद्यामान राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पालिकेला दिलेल्या पत्रानुसार याबाबत ठराव मंजुर करण्यात आला आहे.
मुंबई उपनगरातील पश्‍चिम व पूर्व जोडणार्‍या जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडला काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे नाव देण्यास मागणी पालिकेतील काँग्रेसचे विरोधी नेते रवी राजा यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्‍वर यांच्याकडे केली आहे. याला नगरसेवक बाळा नर यांनी विरोध दर्शविला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे नाव देण्यास विरोध नाही तर ज्या जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडला अगोदरच ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ हे नाव पालिका सभागृहाने मंजुर केले आहे. तत्कालिन नगरसेवक व विद्यमान राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी १६ डिसेंबर १९९४ रोजी या रस्त्याला ‘संत शिरोमणी श्री गाडगेबाबा महाराज मार्ग’ नाव देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समिती (उपनगरे) यांना दिला होता.
३ ऑक्टोबर १९९४ रोजी (ठराव क्रमांक ७०५) नुसार जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडला ‘संत शिरोमणी श्री गाडगे महाराज मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे.पालिका चिटणीस खात्याने मंजुर ठरावाची कॉपी तत्कालिन पालिका आयुक्त १० ऑक्टोबर १९९४ रोजीही पाठवली आहे. ठराव मंजुर झाल्यावर या रस्त्याला ‘संत शिरोमणी श्री संत गाडगे महाराज मार्ग’च्या नावाची पाटी तात्काळ लावण्याचे लेखी पत्रही देण्यात आले आहे. जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडला ‘संत शिरोमणी श्री संत गाडगे महाराज मार्ग’ देण्याचा प्रस्ताव १९९४ सालीच मंजुर झाला असताना, पुन्हा नव्याने दुसरे नाव देणे उचित ठरणार नाही, असे मत विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केले आहे.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्माराकावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची कोल्हेकुई सुरु

News Desk

वांद्रे येथे इमारत कोसळली, १६ जण जखमी तर दुर्घटनाग्रस्तांना शासनाने मदत करण्याची शेलारांची मागणी

swarit

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधन

News Desk