HW News Marathi
राजकारण

…मग राम मंदिर बांधायला जावे !

मुंबई | मुंबईत आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधावे आणि मग राम मंदिर बांधायला जावे,असा खोचक टोला नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारा दिला होता. सभेसाठी लोकांची जमवाजमव केली होती. शिवसैनिक उत्स्फूर्तपणे मेळाव्याला आले नव्हते. तर त्यांना जबरदस्ती आणले गेले होते, असा आरोप राणे यांनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा विषय काढला नाही. लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राम मंदिराचा विषय काढला आहे. २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाण्याची घोषणा करणार्‍यांनी राम मंदिर बांधण्याची काय तयारी आहे, हे आधी स्पष्ट करावे, असा सवालही यावेळी नारायण राणे यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी आपला शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा !

News Desk

मुख्यमंत्री पदी विराजमान होताच कमलनाथ यांच्या अडचणीत वाढ

News Desk

सरकारने मागितला तरचं RSS सल्ला देते । डॉ भागवत

News Desk