HW News Marathi
महाराष्ट्र

कापूस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

संग्रामपूर | कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवून धरला. यावेळी सरकार विरोधी देखील देण्यात आल्या.

सोयाबीन आणि कापुस हमी भाव जाहीर करून शेतकऱयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ऑनलाईनच्या गोंधळामुळे गतवर्षी जे शेतकरी पीकविमा भरण्या पासून वंचित राहले. त्यांना ५० टक्के पिकविम्याची रक्कम देण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन स्वाभिमानी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. वरवट बकाल या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून घोषणा देत वाहने अडविण्यात आली. रस्त्यावर टायर जाळून हे आंदोलन करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल १ रूपयांनी होणार स्वस्त

News Desk

औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक

News Desk

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk
राजकारण

सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमात शीतपेयऐवजी दूध द्या | नितीन गडकरी

News Desk

मुंबई । सार्वजनिक कार्यक्रमात अथवा घरगुती कार्यक्रमात शीतपेयं ठेवण्या पेक्षा दूध ठेवा. यामुळे विदर्भातील दूध उत्पादकांना आर्थिक आधार लाभेल. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरमधील महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्डतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुगंधित दूध योजनेच्या शुभारंभ झाला. यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर,मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते.

गडकरी यावेळी म्हणाले, सशक्त व चतन्यपूर्ण भारताचा पाया लहान मुले आहेत. त्यांच्या वाढत्या वयात पोषणाच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे असते. दूध हे पूर्णान्न असल्यामुळे मुलांना त्याद्वारे सुदृढ बनवता येऊ शकते. मुले नियमित दूध प्यायली तर त्यांच्या आरोग्य व आकलनविषयक क्षमतांमध्ये सुधारणा होते. म्हणूनच शीतपेयाऐवजी दुधाला प्राधान्य द्यावे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गिफ्टमिल्क सुरू करू, अशी घोषणा केली. नागपूर जिल्ह्यत २१ शाळांमध्ये ही योजना लागू केली असून त्याचा सहा हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्डला मदर डेअरी फ्रुट एण्ड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या सीएसआर मदतीअंतर्गत पाठबळ दिले आहे.

Related posts

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

News Desk

राहुल गांधींच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

मी राजकारण सोडून देईन !

News Desk