HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल १ रूपयांनी होणार स्वस्त

मुंबई -मंगळवारी मध्यरात्री पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल एक रूपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमंतीमुळे सर्व सामान्यांमध्ये सरकार विरोधात रोष होता. ही बाब लक्षात घेता आधी गुजरात आणि आता महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट कमी केला आहे.

दिवाळीची जनतेसाठी ही भेट असल्याची प्रतिक्रीया अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दिला आहे. शिवाय पेट्रोल २ रूपये तर डिझेल १ रूपयांनी स्वस्त होणार असल्याचे ट्विटही त्यांनी केलं आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे केंद्रा बरोबर राज्य सरकारवर ही जोरदार टिका होत होती. जनतेची भावना लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारांनी व्हॅटचे दर कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna

26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाला एकनाथ शिंदेकडून 51 लाखांचं बक्षीस!

News Desk

पत्नी राष्ट्रवादीत, आणि स्वता मात्र शिवसेनेत असणाऱ्या पठ्ठ्याला आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस!

News Desk