HW News Marathi
राजकारण

प्रशांत किशोर यांची जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती

पाटणा | निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर हे जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. प्रशांत किशोर यांनी स्वत: आपल्या या नव्या प्रवासाबद्दलची माहिती ट्वीट करून दिली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले होते. आता किशोर यांची थेट पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

प्रशांत किशोर यांचा भारतीय मतदारांच्या बाबतीत संपूर्ण, तगडा अभ्यास आहे. नितीश कुमार यांचा प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे प्रशांत यांनी जेडीयूच्या नेत्यांना नितीश यांच्या स्वच्छ प्रतिमेचा प्रचार करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती मिळत आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयानंतर, अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यात काहीतरी वाद झाल्याचे म्हटले जात होते. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासाठी रणनिती आखली होती.

विशेष म्हणजे जेडीयूमध्ये आतापर्यंत राष्‍ट्रीय उपाध्यक्ष असे पद नव्‍हते. परंतु प्रशांत यांच्यासाठी पक्षात हे पद निर्माण करून त्याची जबाबदारी प्रशांत किेशोर यांच्याकडे देण्यात आली आहेकारण किशोर यांना आता पक्षासाठी जबाबदारीचा मोठा भार उचलावा लागणार आहे. तसेच आगामी लोकसभेत पक्षाची कामगिरी सुधारावीच लागणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपशी वाटाघाटीचे मोठे आव्‍हान किशोर यांच्यापुढे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले !

News Desk

जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही ?

News Desk

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk