पाटणा | निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर हे आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत किशोर यांनी स्वत: आपल्या या नव्या प्रवासाबद्दलची माहिती ट्वीट करून दिली आहे. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी आज (रविवार) पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत प्रशांत किशोर उपस्थित राहतील.
Excited to start my new journey from Bihar!
— Prashant Kishor (@PrashantKishor) September 16, 2018
“अधिकृत घोषणेची वाट पाहा, आता फक्त त्यांनी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. आमच्या पक्षात आम्ही त्यांचे स्वागत करू” असे जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रशांत किशोर हे जेडीयू आणि बिहार सरकार यांच्यात महत्त्वाची भूमिका पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान,बिहार निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांच्या यशात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा आहे.
Let us wait for the official announcement, he has expressed his willingness, we will welcome him in the party: KC Tyagi,JDU on election strategist Prashant Kishor set to join Janata Dal(United) today pic.twitter.com/AQd74WSD7m
— ANI (@ANI) September 16, 2018
प्रशांत किशोर हे येत्या काळात निवडणूक लढवणार असल्याची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठया पक्षांशी प्रशांत यांचे चांगले संबंध असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या या पक्ष प्रवेशाच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.