HW News Marathi
राजकारण

लोडशेडिंग विरोधात राष्ट्रवादीचे ‘कंदील’ आंदोलन

मुंबई | लोडशेडींगमुळे ( भारनियमन) राज्यातील जनता हैराण झाली असून याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ज्या-ज्याठिकाणी लोडशेडिंग ( भारनियमन ) आहे. त्याठिकाणी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘कंदील’ आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाय युवक संघटनेच्यावतीने एमएसईबीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करून निषेध नोंदविला जाणार आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असतानाच आता वीजवितरण महामंडळाकडून लोडशेडिंग ( भारनियमन ) केले जात असल्याने सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. राज्यातील जनतेच्या समस्यांसाठी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता लोडशेडिंगच्याविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

राज्यात ज्या ज्याठिकाणी लोडशेडिंग ( भारनियमन ) सुरु आहे त्या त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या ‘कंदील’ आंदोलन करणार आहेत. शिवाय राष्ट्रवादीची युवक संघटना एमएसईबीच्या कार्यालयासमोर वैध मार्गाने आंदोलन करून जाब विचारणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

घाबरु नका मी, काय छोले भटूरे खाणार नाही | मुख्यमंत्री

News Desk

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी !

News Desk
राजकारण

प्रेक्षक गॅलरीतून दिसणारे मुंबईचे दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडणारे !

News Desk

मुंबई | प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरीतून मुंबईच्‍या प्रिन्‍स नेक्‍लेसचे दिसणारे विहंगम दृश्‍य डोळयाचे पारणे फेडणारे असून मुंबईकरांनी त्‍याचा आनंद घ्‍यावा, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे यांनी केले.

मलबार हिल येथील ‘ प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ चे लोकार्पण युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्‍य ठाकरे व मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा हस्‍ते बी.जी. खैर मार्गावरील, कमला नेहरु उद्यानालगतच्‍या ‘ प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’ येथे आज बुधवारी सायंकाळी पार पडले. त्‍यावेळी प्रसार माध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्षा अरुंधती दुधवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्‍यक्ष अतुल शहा, स्‍थानिक नगरसेविका जोत्‍स्‍ना मेहता, तसेच पालिकेचे संबंधि‍त अधिकारी उपस्थित होते.

या गॅलरीचे वैशिष्‍टय म्‍हणजे दिव्‍यांगसाठी विशेष सुविधा, मलाड स्टोनमध्‍ये बांधकाम, स्‍टि‍ल व मोझेक काचेचे संरक्षक कठडे, काचेचे पारदर्शी उद्ववहन, फ्लड लाईटची सुविधा, अॅम्‍पी थेयिटरची सुविधा आदी सुविधांनी परिपूर्ण ही वास्‍तु बृहन्‍मुंबई महापालिकेने उभारली आहे. प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी टेलिस्‍कोपमधून मुंबईचे विहंगम दृश्‍य बघि‍तले.याप्रसंगी संबधित विभागाच्‍या वतीने सादरीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिक उपस्थिती होते.

Related posts

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

पंतप्रधान मोदी ‘जुमला राजा’ तर त्यांची राजवट ‘चौपट राज’

News Desk

संबित पात्रांच्या व्हिडीओमुळे मोदी सरकारची उज्ज्वला योजना गोत्यात

News Desk