HW News Marathi
महाराष्ट्र

निरुपम म्हणजे परप्रांतीय भटका कुत्रा, मनसेचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | “उत्तर भारतीय समाजातील लोकच मुंबई आणि महाराष्ट्र चालवतात. त्यांनी ठरवले तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प होईल,” असे वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी करत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय निरुपम हे परप्रांतीय भटका कुत्रा असून, परप्रांतीय मतांवर डोळा ठेवून आहेत असे विधान करणारी मनसेची पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

“उत्तर भारतीय मंडळी महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात सक्रीय असून तेच संपूर्ण मुंबई चालवतात. उत्तर भारतीय कोणत्याच कामात मागे नाहीत. सगळ्या क्षेत्रात ते सक्रिय आहेत. उत्तर भारतीय लोक टॅक्सी-रिक्षा चालवण्यापासून दूध विकण्यापर्यंतची सगळी काम ते करतात. मुंबईकरांचा भार उत्तर भारतीय त्यांच्या खांद्यावर घेऊन चालत असतो. जर कधी उत्तर भारतीयांनी काम करायचे नाही असे ठरवले तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प पडेल. मुंबईकरांना जेवायला सुद्धा मिळणार नाही. आम्ही असे काही करणार नाही पण आम्हाला हे सगळे करण्यास भाग पाडू नका,” असे वक्तव्य संजय निरुपम यांनी यांनी केले होते.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे त्यावेळी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. संजय निरुपम हे कायमच त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता त्यांच्या या वक्त्यव्यामुळे देखील त्यांना प्रचंड मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार असून यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्याला गर्दी जमवल्याप्रकरणी पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल

News Desk

फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना दिलेल्या धमक्यांचे व्हिडिओ बाहेर काढायला लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना इशारा

News Desk

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ३ जणांची निर्घृण हत्या

News Desk