नवी दिल्ली | ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मध्यरात्री मागे घेण्यात आले. भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्ली येथील किसान घाटावर जाण्यास परवानगी दिली. यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर मंगळवारी (२ ऑक्टोबर) किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आली होती.
'Kisan Kranti Padyatra' ends at Delhi's Kisan Ghat
Read @ANI Story | https://t.co/GEheNuSBVh pic.twitter.com/RnT8cOklSZ
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2018
या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेशाच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी जमावबंदी (१४४ कलम) लागू केली आहे. आलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन किसान घाटावर जाण्याची परवानगी दिली.
The 'Kisan Kranti Padyatra' that started on Sept 23 had to end at Delhi's Kisan Ghat. Since Delhi police didn't allow us to enter we protested. Our aim was to finish the yatra which has been done. Now we'll go back to our villages: Naresh Tikait, President, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/P7xvF4YTFI
— ANI (@ANI) October 2, 2018
‘शेतकऱ्यांनी किसान घाटवर फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून आमच्या मागण्या पुर्ण झालेल्या नाहीत.’ असा आरोप भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैट यांनी केला असून आंदोलन मागे घेतल्यानंतर शेतकरी घरी परतण्याचे आवाहन केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.