HW News Marathi
मुंबई

एल्फिन्स्टन घटनेला वर्षपूर्ण, परिस्थिती ‘जैसे थे’

धनंजय दळवी | थांबला तो संपला याचे प्रात्यक्षिक मुंबईत खऱ्या अर्थाने दिसून येते. थांबणे हे मुंबईकरांच्या रक्तात नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी याच दिवशी घडलेल्या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या घटनेला वर्ष पूर्ण झाले. याचीच जाणीव ठेवत मुंबईतील अनेक मुंबईकरांनी आज परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या या घटनेतील मृतांना आदरांजली वाहिली.

काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानंतर वर्षभरापूर्वी घडलेल्या एल्फिन्स्टनच्या घटनेची आठवण झाली. अवघ्या २४ तासांवर येऊन ठेपलेल्या दसरा सणासाठी एल्फिन्स्टन पूलांवर नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरु होती. तितक्यात ‘पूल गिरा, फूल गिरा’ अशी अफवा उडाली आणि दसऱ्याच्या मुहूर्तावरच अनर्थ घडला.

दीडशे मीटरच्या ‘मर्यादारेषा’ पुसट, रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा धंदा सुरू…

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी याच दिवशी घडलेल्या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. अनेक उपाययोजनांमध्ये रेल्वे स्थानक परिसरांतून फेरीवाल्यांना हद्दपार करण्याच्या योजनेचाही समावेश होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ खट्याक देखील केले. अनेक फेरीवाल्यांचा चोप दिला. कार्यकर्ते केस पडल्या पण फेरीवाल्यांवर त्याचा कोणताही फरक पडलेला दिसत नाही आहे.

या घटनेत २३ जणांचे बळी घेणाऱ्या त्या घटनेनंतर रेल्वे स्थानकांपासून दीडशे मीटर अंतरात फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला. त्यासाठी पालिकेने दीडशे मीटरवर मर्यादारेषा आखल्या होत्या. मात्र अवघ्या वर्ष भरात ही मर्यादा रेषा पुसट झाली आहे. दीडशे मीटर अंतरात बसणारे फेरीवाले आता दहा मीटरच्या आत बसतात. कुर्ला, दादर, घाटकोपर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अंधेरी, विलेपार्ले, कल्याण, ठाणे या महत्त्वाच्या स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा धंदा करतांना दिसत आहे.

या घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेला खडबडून जाग आली. पालिकेने तातडीने रेल्वेलगतच्या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावरील जागा ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आल्या. रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरावर ‘मर्यादारेषा’ आखण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मर्यादा रेषा आखून ती ओलांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी बंदोबस्तही करण्यात आला. पण गेल्या काही महिन्यांपासून कुर्ला, दादर, घाटकोपर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अंधेरी, विलेपार्ले, कल्याण, ठाणे आदी रेल्वे स्थानकांबाहेर पुन्हा फेरीवाल्यांनी धंदा सुरू केला असून पूर्वीप्रमाणेच फेरीवाल्यांच्या आवाजात हा भाग हरवून जाऊ लागला आहे. पालिकेची गाडी येताच फेरीवाले या परिसरातून गायब होतात. गल्ली बोळ्यात जाऊन लपतात. तसेच रेल्वे स्थानकांबाहेरील पूर्वीच्याच जागी फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कुर्ला स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी केले मर्यादा रेषेचे सर्रास उल्लंघन –

कुर्ला रेल्वे स्थानकालगत पश्चिमेला मोबाइल, बॅटरी, मोबाइलचे कव्हर, मेमरी कार्ड, बूट आदींची विक्री करणारे फेरीवाले पुन्हा दिसू लागले आहेत. मात्र पूर्वीच्या तुलनेत फेरीवाल्यांची संख्या कमी आहे. पूर्वीच्या तुलनेत या भागात फेरीवाल्यांचा उपद्रव कमी आहे. मात्र रेल्वे स्थानकांजवळच्या परिसरात हळूहळू फेरीवाल्यांची संख्या वाढून परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

swarit

कुत्र्यावर बलात्कार…मुंबईत सुरक्षारक्षकाला अटक

News Desk

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा, भिंत पडल्याने कुर्ल्यात तीन जण जखमी

News Desk