HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात मुळा कालव्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया

पुणे | पुण्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुळा कालव्याच्या भिंतीला गुरुवारी सकाळी मोठे भगदाड पडल्याची घटना घडली. कालव्याला अचानक भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलावरून सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. यामुळे रस्तादेखील बंद करण्यात आला आहे. कालव्याचे पाणी सर्व्हे नंबर १३० झोपडपट्टीमध्ये शिरले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पालिका तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल असून कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कळवा जातो, याच कालव्याची भिंत कोसळली. पाणी घुसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणतीही आपत्कालीन सेवा अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही, यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/301512643783890/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकर न.प.इतिवृतात खाडाखोड करणा-यांविरुद्ध कारवाई करा

News Desk

मला कुणी शिकवण्याची गरज नाही, फडणवीस बोलले तरच उत्तर देईन!

News Desk

“परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता”

News Desk