HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई पोलीस’ आपला ब्रँड बाजारात आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय काय वस्तू असणार

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर संजय पांडे यांनी नागरिकांशी संवाद वाढवला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या तक्रारीकडे लक्ष देऊ स्वतः ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी वैयक्तिक मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळे नागरिक आपल्या समस्या त्याच्या पुढे माडू शकत आहेत.

आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून एका सामाजिक कार्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणजे मुंबई पोलिसांच्या ब्रॅण्डकडून काही वस्तू या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या वस्तुंच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांचा वापर हा मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापरले जातील, अशी माहिती पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे झालेल्या संवादावेळी दिली.

मुंबई पोलिसांच्याच ब्रँडने देऊ केलेले कपडे, परफ्यूम, पाण्याच्या बाटल्या, टोप्या आणि इतर उत्पादने नागरिक लवकरच खरेदी करू शकतील, अशी घोषणा आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान केली. या बाबतची प्रक्रिया सुरू असून एप्रिलअखेरपर्यंत ही उत्पादने बाजारात उपलब्ध होतील, असे शहर पोलीस प्रमुखांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वस्तूची किंमत पोलिस ठरवणार असून रविवारपर्यंत दर निश्चित होण्याची शक्यता आहे. सरकारी नियमानुसार कंत्राटे दिली जातील, जे पक्षकार मुंबई पोलिसांना चांगली रक्कम देऊ शकतील त्यांनाच ही कंत्राटे दिली जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

7 एप्रिलनंतर शिवसेनेकडून मंत्रिमंडळात फेरबदल ?

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी दिल्लीच्या वकिलांशी अशोक चव्हाणांनी केली चर्चा

News Desk

सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार! – किरेन रिजिजू

Manasi Devkar