HW News Marathi
मुंबई

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

मुंबई | दरवर्षी हजारो टन कचरा महासागरात वाहत असतो, त्यातील ६०% प्लास्टिक सामग्री आढळते. प्लास्टिक विशेषत: महासागरात दीर्घ काळ टिकते प्लास्टिक सागरी जीवनासाठी अतिशय घातक आहे. लाखो पक्षी, व्हेल आणि महासागरातील प्रचंड प्रमाणात मासे यामुळे मरतात. याचं विषयाचे गांभीर्य लक्षात घेता कोस्टल क्लीनअप डे दिवसाचे औचित्य साधुन अंघोळीची गोळी आणि कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दादर चौपाटी परिसर युवकांनी स्वच्छ केला. पाण्यातील कचऱ्यामुळे वन्यजीव, मानव आणि समुद्रात काम करणाऱ्यांच्या जीवनावर परिणाम होतो.

यामुळे सागरी पर्यटन आणि मनोरंजनावरदेखील परिणाम होतात. अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग, बचत या आपल्या तत्वांच्या माध्यमाने गेल्या काही काळापासुन पाणी बचत आणि संवर्धन, खिळेमुक्त झाडं आणि प्लास्टिकच्या बदल्यात रोपटी देण्याचे अभिनव काम विविध शहरांत करत आहे. दिड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर चौपाटीवरील फुले, हार निर्माल्य आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक यावेळी या युवकांनी जमा केले. किनारपट्टी आणि समुद्र स्वच्छतेची गरज आणि आवश्यकता यावर उपस्थितांना यावेळी जागृत करण्यात आले. यावेळी बीच प्लीज, क्रिसिल आणि युनायटेड वेया इतर संस्थांच्या तरुणांनी देखील आपला सहभाग नोंदवला.

प्लास्टीकचे समुच्चय नियोजन करण्यासाठी आणि किनारपट्टी व समुद्र स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे असे यावेळी कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या तेजश्री देवडकर या विद्यार्थिनीने सांगितले त्याचबरोबर यापुढे देखील आम्हीं महाविद्यालयाच्या वतीने सातत्यने हे काम करण्याचा प्रयत्न करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणाच्या प्रत्येक प्रश्नावर युवकांनी प्रत्यक्ष काम केले तरच आपण भविष्यात येणारे धोके टाळू शकतो यांसाठी प्रत्येकाने प्लास्टीकचा त्याग केला पाहिजे असे अंघोळीची गोळी संस्थेचे समन्वयक सागर वाळके यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी जवळील ‘हिमालय’ पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

News Desk

मालाडच्या सोमवार बाजारमध्ये आग

News Desk

अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

News Desk
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk